ताडोबात पुन्हा झालं दुर्मिळ ब्लॅक पँथरचं दर्शन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

 महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळा बिबट्याचं म्हणजेच ब्लॅक पँथरचं पुन्हा दर्शन झालं आहे.

चंद्रपूर : महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळा बिबट्याचं म्हणजेच ब्लॅक पँथरचं पुन्हा दर्शन झालं आहे. अमरावतीचे वाईल्डलाईफ फोटोग्राफर अनुराग गावंडे यांना या दुर्मिळ काळा बिबट्याने दर्शन दोन दिवसांपूर्वी दर्शन दिलं. हा काळा बिबट्या मागील तीन वर्षांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात राहत आहे.

सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

काळा बिबट्या हा फार दुर्मिळ आहे. एका काळ्या बिबट्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आल्यानंतर अनेकांनी त्याला बघण्यासाठी ताडोबाला भेट दिली आहे. परंतु, आत्तापर्यंत फार कमी पर्यटकांना त्यानी दर्शन दिलंय. अमरावतीचे वाईल्डलाईफ फोटोग्राफर अनुराग गावंडे दोन दिवसांआधी ताडोबाला गेले असता, त्यांना या काळ्या बिबट्याचं मनसोक्त दर्शन घेता आलं. त्याचा रस्त्यावरून आरामात चालत असतानाचा व्हिडीओदेखील त्यांनी टिपला आहे. या काळ्या बिबट्याला बघण्याचा अनुभव काही निराळाच असल्याचं अनुराग गावंडेंनी सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anurag Gawande (@anurag10ag)

"हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? सरकारला लाज वाटायला हवी"

असाच काळा बिबट्या काही वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातही आढळला होता, सामान्य रंगाचे बिबट्या आणि काळा बिबट्या हे एकाच प्रजातीचे आहेत. पिग्मेंटेशनच्या जास्त प्रमाणामुळे रंगात फरक आहे ज्यामुळे हा काळा बिबट्या एका मोठ्या काळ्या मांजरीसारखा दिसू लागतो. हा काळा बिबट्या सहसा महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आसाम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये आढळतो.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anurag Gawande (@anurag10ag)

संबंधित बातम्या