रत्नागिरीच्या नागरीकांवर नजर ठेवणार पोलिसांचा तिसरा डोळा

रत्नागिरीच्या नागरीकांवर नजर ठेवणार पोलिसांचा तिसरा डोळा
drones

रत्नागिरीत: महाराष्ट्रातील रत्नागिरी (Ratnagiri Lockdoen)जिल्हात सध्या कडकडीत लॉकडाऊन सुरु आहे. 9 जूनपर्यंत हा लाँकडाऊन असाच कायम राहणार आहे. या लाँकडाऊनच्या काळा विनाकारण रस्त्यांवर फिरणा-या लोकांवर जिल्हा पोलीस आता ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. शहराची व्याप्ती मोठी असल्यानं नाकाबंदी करण्यात आली आहे.(Ratnagiri district police will now monitor civilians through drones)

परंतु शहरातील नागरीकांवर ड्रोनच्या माध्यमातून देखील नजर ठेवली जाणार आहे. रत्नागिरीत कडक अंमल बजावणी सुरु आहे पोलीस प्रशासन आता अँक्शन मोडवर आले असून विनाकारण फिरणा-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक वाहनांची तपासनी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा, ई पास असेल तरच त्याला सोडलं जात आहे. अन्यथा वाहन देखील जप्त करण्याचा अधिकार जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांना दिला गेला आहे.  जिल्ह्यात 57 तपासणी नाके आहे..जिल्हा बंदी असल्याने बाहेरील व्यक्तीना रत्नागिरीत येण्याची परवानगी नाही त्यामुळे कडक लाँकडाऊनची अंमलबजावणी पोलीसांकडून सध्या सुरु आहे.

पोलिसांनी रत्नाागिरीत तब्बल 57 तपासणी नाके उभारले आहेत. प्रत्येक शहरांमध्ये 2 ते 3नाके आहेत. या कामासाठी होमगार्डही मदतीला घेतले आहे. त्यामुळे रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. रत्नागिरी पोलिस प्रभावी अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहेत. मात्र मर्यादीत मनुष्यबळामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे. त्यावर देखील पोलिस दलाने पर्याय ड्रोनचा पर्याय शोधला आहे.

पोलिस दलाने ड्रोन कॅमेऱ्याचा पर्यायी उपाय काढला आहे. आता पोलीस प्रशासनानंतर ड्रोन चा तिसरा डोळा विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर असणार
आहे. कालपासून शहरात या ड्रोन कॅमे-याचा वापर करणे सुरू झाले आहे. एका ठिकाणी थांबून आजू-बाजूच्या परिसरामध्ये विनाकारण रस्त्यावर कोण फिरत आहे का फिरत आहे याची पाहणी केली जात आहे. या ड्रोन कॅमेरात कोणी आढळल्यास पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जात आहे. लॉकडाउनच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी पोलिस प्रशासनाने आवश्यकतेनुसार या ड्रोनचा कालपासून तिसरा डोळा म्हणून वापर सुरू केला आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर वॉच ठएवण्यासाठी या आधूनिक  उपकरणाचा फायदा झाला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com