पंचतारांकित हॉटेल मधून चालायचे सचिन वाझेंचे वसुलीचे काम ?

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

अँटीलिया प्रकरणात तपास यंत्रणेने दाखल केलेल्या हत्येप्रकरणी एनआयएने आता पर्यंत डीसीपी पदापर्यंतच्या 35 अधिका्यांची चौकशी केली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली कार आणि  मनसुख हिरेन प्रकरणात अटक असलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वझे यांची एनआयएकडून चौकशी सुरु आहे. सचिन वाझे हे मुंबईतील एका हॉटेलच्या रूमनंबर 1964 मध्ये राहत होते व येथून खंडणीखोरीचे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. अँटीलिया प्रकरणात तपास यंत्रणेने दाखल केलेल्या हत्येप्रकरणी एनआयएने आता पर्यंत डीसीपी पदापर्यंतच्या 35 अधिका्यांची चौकशी केली आहे.

या प्रकरणात सचिन वाझे यांनी नरिमन पॉईंटवर बनावट आधार कार्ड वापरुन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती. खोली बुक करण्यासाठी सुशांत सदाशिव खामकर या बनावट नावाचा वापर सचिन वाझे यांनी केला असल्याचा दावा एनआयएने केला आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, 16 फेब्रुवारी रोजी वाजे इनोव्हा गाडीतून हॉटेलमध्ये गेले आणि 20 फेब्रुवारीला लँड क्रूझरमध्ये बसून हॉटेलच्या बाहेर गेले होते. ही दोन्हीही वाहने आता एनआयएने जप्त केली असल्याचे समजते आहे. याच हॉटेल सचिन वझे  वसुली आणि इतर काम करत असल्याचे समजते आहे. 

कोरोनाचा धुमाकूळ; महाराष्ट्रातील पुण्यात 'शॉर्ट लॉकडाऊन' जाहीर

फेब्रुवारी 2021 मध्ये सचिन वाझे (Sachin vaze) राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीची पाहणी एनआयएच्या पथकाने केली आहे. सचिन वाझेंना कोण भेटायचे याचा तपास करण्यासाठी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही एनआयएने (NIA) हस्तगत केले आहेत. आतापर्यंत औपचारिकरित्या अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले असून, मुंबई पोलिस (Mumbai Police)  दलातील काही अधिकाऱ्यांची अनौपचारिकरित्याही चर्चा केली असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

संबंधित बातम्या