गोव्यासह अन्य राज्यांचे न्यायालयीन कामकाज नियमितपणे सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

1 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश, दादर, नगर हवेली आणि दमण दीव राज्यातील सर्व गौण निम्न न्यायालये नियमितपणे शारीरिक कामकाज सुरू केले जाणार आहे.

मुंबई: 1 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश, दादर, नगर हवेली आणि दमण दीव राज्यातील सर्व गौण निम्न न्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरू केले जाणार आहे. कोरोना नियमांचे पूर्ण पालन करून सर्व खटल्यांची नियमितपणे शारीरिकरीत्या उपस्थित राहून सुनावणी सुरू करणार आहेत.

त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे कुलसचिव एस.जी. डायजे यांनी सर्व  जिल्हा सत्र न्यायाधीश, प्रधान न्यायाधीश, शहर दिवाणी व सत्र न्यायालय, बृहत्तर मुंबई व मुंबई उच्च न्यायालयांतर्गत सर्व आस्थापना प्रमुखांना याबाबतचे निवेदन दिले आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी हायकोर्ट, केंद्र आणि राज्य सरकारांनी ठेवलेल्या सर्व सुरक्षा आणि खबरदारीच्या नियमांयांचे पालन करण्याचे निर्देश निबंधक जनरल यांनी दिले आहेत. नियमित सुनावणीबाबत तारीख पे तारीख ऐकणे आता बंद होणार आहे.

गोवा विधानसभा अधिवेशन: सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुका मिळून एक जिल्हा करता येणार नाही -

गेल्या एका वर्षापासून महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांसाठी एका शिफ्टमध्ये सुरू असलेले जिल्हा न्यायालयाचे कामकाज आता सर्व प्रकरणांसाठी नियमितपणे सुरू होणार आहे पूर्ण क्षमतेने न्यायालयीन काम सुरू करण्याबाबत कालच निर्णय झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे मुंबई उच्च न्यायालय, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या पदाधिका-यांची बैठक मुंबईत पार पडली. त्यात झालेल्या निर्णयानुसार 1 फेब्रुवारी म्हणजेच येत्या सोमवारपासून  नियमित कामकाज सुरू होणार आहे.

गोवा विधानसभा अधिवेशन:  लोकांना तो प्रकल्प नको असेल तर सरकार परवानगी देणार नाही -

वर्षभर कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे न्यायालयीन कामकाजही ठप्प होते. मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर फक्त महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी सुरू करण्यात आली होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाचे कुलसचिव एस.जी. डायजे यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे.

 

संबंधित बातम्या