Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता ,सरकारचा व्यापाऱ्यांना दिलासा

राज्यातील 25 जिल्ह्यांना दिलासा देत निर्बंध शिथिल(Maharashtra Lockdown) करण्यात आले आहेत
Relaxations in restrictions in Maharashtra
Relaxations in restrictions in MaharashtraDainik Gomantak

राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची(Maharashtra Lockdown) नवी नियमावली आज जारी करण्यात आली असून या नव्या नियमावलीनुसार 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला असून परवा म्हणजे 4 ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.

राज्यातील 25 जिल्ह्यांना दिलासा देत निर्बंध शिथिल(Lockdown) करण्यात आले आहेत, या जिल्ह्यांमध्ये(Maharashtra Lockdown) दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. ही अंबजावणी बुधवारपासून होणार आहे. तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत ही वेळ देण्यात आली आहे. रविवारी मात्र फक्त अत्यावश्यक सेवांच सुरु राहतील. (Relaxations in restrictions in Maharashtra)

मात्र 11 जिल्ह्यांना अद्याप कुठलीही सूट देण्यात येणार नाही असेही त्यांनी स्प्ष्ट केले आहे.म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम असणार आहेत.

Relaxations in restrictions in Maharashtra
चुकीला माफी नाही; संजय राऊतांचा BJP ला इशारा

काय आहे नवी नियमावली -

  • शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी दुकाने, मॉल बंद राहतील.

  • सर्व सार्वजनिक उद्याने आणि मैदाने व्यायामाच्या उद्देशाने खुली असणार आहेत .

  • सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. मात्र शक्य असेल्यास वर्क फ्रॉम होम सुरु ठेवावं असेही सांगण्यात आले आहे.

  • सर्व कृषी उपक्रम, बांधकामे, औद्योगिक कामे, माल वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करता येणार आहे.

  • व्यायामशाळा, योग केंद्रे, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरु 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार. मात्र एसीचा वापर करता येणार नाही. रविवारी ही सेवा बंद राहणार.

  • सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आतील) पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार.

  • राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com