धनंजय मुंडेंना दिलासा, राजीमाना घेणार नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

धनंजय मुंडे यांना सध्या तरी पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांचा लगेच राजीनामा घेतला जाणार नाही.

मुंबई :  धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचं स्वरूप गंभीर असून, यावर नीट विचार करून निर्णय घेऊ, असं वक्तव्य शरद पवारांनी काल केलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांना सध्या तरी पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांचा लगेच राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता लवकरात लवकर राजीनामा त्यांनी द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत.

आज मंत्री धनंजय मुंडेंनी काल शरद पवारांची भेट घेत, आपल्यावरच्या आरोपांबद्दल माहिती दिली होती. धनंजय मुंडेंनी दिलेल्या माहितीची राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांबरेबर चर्चा करून कारवाईबद्दल ठरवणार असून, आवश्यक्ता भासल्यास मुख्यंत्र्यांशीही चर्चा करू असं शरद पवार म्हणाले होतो. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नरिमन पॉइंट ते कफ परेड कनेक्टर’ सागरी सेतूचे होणार पुनरुज्जीवन 

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुडेंवर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. मात्र धनंजय मुंडेंनी हे सगळेआरोप फेटाळत फेसबुकद्वारे एक निवेदन जारी केलं आहे. एका महिलेकडून मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली आहे.

यावर धनंजय मुंडेंनी फेसबुकद्वारे एक निवेदन जारी केरत खुलासा केला. कालपासून मिडियामध्ये माझ्याबद्दल काही कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका महिलेने त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये आहे . हे सर्व आरोप खोटे असून, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या