रेमेडीसीवीर औषध पुरवठ्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले; वाचा, सविस्तर

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसीवीर औषधांवरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. भाजपा नेत्याच्या सांगण्यावरून दमन येथील रेमेडिसीवीर औषध पुरवठादाराने महाराष्ट्रात औषध पुरवठा करण्याचे मान्य केल्यामुळे महाराष्ट्र पोलिस औषध पुरवठादारांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसीवीर औषधांवरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. भाजपा नेत्याच्या सांगण्यावरून दमन येथील रेमेडिसीवीर औषध पुरवठादाराने महाराष्ट्रात औषध पुरवठा करण्याचे मान्य केल्यामुळे महाराष्ट्र पोलिस औषध पुरवठादारांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. ब्रूक फार्मा कंपनीत 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्ही ब्रूक फार्मा कंपनीचे मालक डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीत डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. (Remedicivir drug Purvathyavarun Maharashtra state environment Tapale) 

रुग्णवाहिका चालवणाऱ्या अनिता यांची प्रेरणादायी कहाणी

दरम्यान,  ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमेडीसीवीर इंजेक्शन चा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांनीच ही महाराष्ट्रासाठी ही इंजेक्शन्स बूक केली होती. मात्र राजेश डोकानिया यांना अटक केल्यामुळे याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र पोलिस आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. चार दिवसांपूर्वी आम्ही ब्रूक फार्मा कंपनीला महाराष्ट्रात रेमेडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. आपण परवानगी देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर मी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा करून  रेमेडिसवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासना (एफडीए) कडून परवानगी घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतल्याचे कळल्यानंतर आम्ही मी, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांलय गाठले आणि पोलिसांना जाब विचारला. 

धक्कादायक! ऑक्सिजन अभावी दीड तासात गोंदियात 15 जणांचा मृत्यू

दरम्यान,  गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे कंपनीकडे  इंजेक्शनचा साठा पडून होता. हे पाहता महाराष्ट्रात 
कायदेशीर रित्या इंजेक्शन्सची निर्यात महाराष्ट्रात व्हावी, यासाठी  भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.  मात्र राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या विशेष अधिकाऱ्याने राजेश डोकानिया यांना फोन करुन, तुम्ही या इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब विचारला. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासानाची  परवानगी असतानाही त्यांनी फक्त भाजपच्या नेत्यांना इंजेक्शनचा साठा पुरविण्याची मान्यता दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासानाच्या परवानगीदेखील होती. तसेच,  राज्य सरकारमधील सरकारमधील मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिल्याचाही पुरावा आमच्याकडे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

संबंधित बातम्या