'येत्या तीन- चार दिवसांमध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल'

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

 महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे लसीकरण मोहीम ठप्प पडली आहे.  रुग्णालये भरून गेली असून रूणांना बेड, ऑक्सिजन, मिळेनासे झालेत. एकंदरीत राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

मुंबई :  महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे लसीकरण मोहीम ठप्प पडली आहे.  रुग्णालये भरून गेली असून रूणांना बेड, ऑक्सिजन, मिळेनासे झालेत. एकंदरीत राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अशातच, राज्यात येत्या तीन ते चार दिवसात रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आहे. तसेच,  रेमडीसीविर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारने  बंदी घातल्याने राज्याला लवकरच इंजेक्शन उपलब्ध होतील. त्याचबरोबर काही नवीन काही कंपन्यांनादेखील राज्य सरकारने इंजेक्शन पुरवण्यासाठी मान्यता दिली असून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा सुरळीत साठा उपलब्ध होईल, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे. ('Remedicivir injection supply to be restored in next three-four days') 

केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी;...

रेमडीसीविर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत चर्चा झाल्याचे यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशा पद्धतीने वाढवला जाईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंत महाराष्ट्रात दररोज ५५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, मात्र काल पर्यंत त्यांनी ३७ ते ३९ हजारपर्यंतच रेमडेसिवीर पुरवल्याचे डॉ.शिंगणे यांनी स्पष्ट केलं आहे. 

कोरोना काळात मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राला केली मोठी मदत
 
त्याचबरोबर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रेमडीसीविर इंजेक्शनच्या प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांचे हाल होत असून रुग्णांचा मृत्यूदरात वाढ होण्याचा धोकाही वाढला आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यासाठी इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाहीत ही चिंतेची बाब असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे. तथापि, महाराष्ट्रातील रुग्णांची आकडेवारी पाहता रूग्णसंख्येतील वाढ आणि रूग्णांना रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवण्यावर भर देणं गरजेचं आहे.  याबाबत आमची चर्चा झाली असून येत्या १९-२० एप्रिल नंतर राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन उत्पादक कंपनी मालकांनी दिल्याचंही डॉ. शिंगणे यांनी नमूद केलं.  

संबंधित बातम्या