आजपासून मुंबईतील रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महागणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

शनिवारी परिवहन मंत्रालयाने मंबईतील रिक्षा व टॅक्सीच्या रात्री आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या दरात सुधारणा केली आहे. सुधारित दर हे 1 मार्च म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत.

मुंबई : शनिवारी परिवहन मंत्रालयाने मंबईतील रिक्षा व टॅक्सीच्या रात्री आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या दरात सुधारणा केली आहे. सुधारित दर हे 1 मार्च म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत. ही वाढ मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरासाठी मर्यादित असेल. मुंबईकरांना आता रात्री रिक्षातून प्रवास करण्यासाठी 27 रुपये द्यावे लागतील, तर टॅक्सीसाठी 32 रुपये आकारले जातील. सुधारित भाड्यांमुळे 1 मार्चपासून ऑटो आणि टॅक्सीची वाहतूक महाग होणार आहे. आजपासून रिक्षाचे किमान भाडे 18 रुपयांवरून 21 रुपये होईल, तर टॅक्सीचे  22 रूपयांवरून 25 रूपये होणार आहे. 

कोरोनामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ; सलग तिसर्‍या दिवशी 8 हजारांहून अधिक रूग्णांची नोंद

परिवहन संचालक अविनाश ढाकणे यांनी ही घोषणा केली. 1 जून पासून इलेक्ट्रॉनिक मीटरनेच भाडे वसूल केले जाणार असल्याचे ते म्हणाले. रिक्षा आणि टॅक्सी युनियनने भाडेवाढीचे स्वागत केले आहे. वाहन चालकांनी सांगितले की, इंधन, देखभाल, विमा या खर्चात वाढ होऊनही एक पैशांची दरवाढ झाली नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

Lockdown : महाराष्ट्रातील अमरावती मध्ये लॉकडाउनचा मुक्काम वाढला; अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत एमएमआरटीएची बैठक

चार सदस्यीय खतुआ पॅनेलच्या सूत्रानुसार भाडेवाढ केली गेली असून त्यात टॅक्सीसाठी प्रति किलोमीटर 2.09 रुपये आणि ऑटोरिक्षासाठी  2.01 रुपये भाडे आकारण्यात येणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) सदस्याने सांगितले. सोमवारी परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरटीए बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईत ऑटोरिक्षा आणि टॅक्सी क्षेत्रात सहा वर्षांच्या कालावधीनंतर भाडेवाढ करण्यात आली असून, शेवटची भाडेवाढ 1 जून 2015 रोजी लागू करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या