Lockdown : महाराष्ट्रातील अमरावती मध्ये लॉकडाउनचा मुक्काम वाढला; अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

दैनिक गोमन्तक
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी अमरावती मध्ये 1 मार्चपर्यंत लॉकडाउनचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र आता यामध्ये वाढ करत 8 मार्चपर्यंत लॉकडाउन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये सतत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती सोबतच अकोला, अकोट आणि मुरजितपूर येथेही लॉकडाउनचा निर्णय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर 5 आणि 6 मार्चला पुन्हा याबाबतचा आढावा घेण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळाचे टर्मिनल 1 (T1) पुन्हा सुरू

गेल्या 24 तासांत 16 हजाराहून अधिक कोरोनाची नवी प्रकरणे देशात नोंदली गेली आहेत. व तसेच सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये एवढी आकडेवारी नोंदली गेली आहे. त्यामुळे देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 11,079,979 झाली आहे. व आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून लागू केलेल्या नियमांमध्ये 31 मार्चपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे नवे 16,488 रुग्ण आढळल्याचे सांगितले. आणि देशात महाराष्ट्र आणि केरळ मध्ये कोरोनाने पुन्हा पाय पसरल्याचे दिसून येत आहे. 

Maharashtra Board Exam Date 2021: 20 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार...

महाराष्ट्रात सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाचे 8,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. याशिवाय मुंबईतही एक हजाराहून अधिक कोरोनाची नवीन प्रकरणे आढळली आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे नागपूर, अमरावती अशा भागात कोरोनाच्या निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.  

संबंधित बातम्या