रक्तचाचणीतून मृत्यूचा धोका समजणार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

संशोधकांचा दावा; पाच बायोमार्कर अणूंचा शोध

मुंबई: कोरोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावरील औषधे बनवण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. रशियाने दावा केला आहे की, त्यांनी निर्माण केलेल्या औषधाची नोंदणी लवकरच करण्यात येणार असून, ऑक्‍टोबरपासून लशीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. तोपर्यंत गोळ्यांच्या माध्यमातूनच रुग्णांवर उपचार करण्यात येतील. सद्यःस्थितीत मृत्यूचे प्रमाण काहीसे वाढताना दिसत असले, तरी आता रक्तचाचणीच्या माध्यमातून मृत्यूचा धोका ओळखणे शक्‍य होणार असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात येत आहे.

अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी पाच बायोमार्कर अणूंचा शोध लावला आहे. त्याचा संबंध कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू तसेच त्याची क्‍लिनिकल स्थिती खराब करण्याशी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे बायोमार्कर रुग्णाच्या रक्तात असल्याचे सांगण्यात येते. जे चिकित्सा संकेतकाचे काम करते. 

या संशोधनाची माहिती जर्नल फ्युचर मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधकांनी २९९ कोरोनाबाधित रुग्णांवर यासाठी संशोधन केले आहे. जे १२ मार्च ते ९ मेच्या दरम्यान उपचारासाठी जॉर्ज वॉशिंग्टन रुग्णालयात दाखल झाले होते. एकूण २९९ रुग्णांपैकी २०० रुग्णांमध्ये पाचही प्रकारचे अणू असल्याचे दिसले. यामध्ये सीआरपी, आयईएल- ६, फेरेटीन, एलडीएच आणि डी-डिमर या बायोमार्कर्सचा समावेश आहे. संशोधकांच्या अनुसार या बायोमार्कर अणूंमुळे रुग्णाच्या शरीरात जळजळ, सूज तसेच रक्तस्राव वाढतो. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. 

संबंधित बातम्या