महाराष्ट्रात कोरोनाची चाचणी अजून स्वस्त...लागतील फक्त...

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

राज्यात अगदी सुरूवातीच्या काळापासून निश्चित करण्यात आलेले दर 4 हजार 500 इतके होते. मात्र, त्यानंतर हे दर कमी कमी होत जावून आता 980 रूपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

मुंबई – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना चाचण्यांच्या दराविषयी मोठी घोषणा केली आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या कोरोना चाचणीच्या दरात 200 रूपये इतकी कपात करण्यात आली असून नव्या दरानुसार कोरोना चाचण्यांसाठी 980 रूपये, 1 हजार 400 रूपये आणि 1 हजार 800 रूपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांसाठी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

सुधारित दरांपेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांनी आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात अगदी सुरूवातीच्या काळापासून निश्चित करण्यात आलेले दर 4 हजार 500 इतके होते. मात्र, त्यानंतर हे दर कमी कमी होत जावून आता 980 रूपयांपर्यंत कमी करण्यात आले असल्याची माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिली.  

कोरोना चाचणीच्या दरात तीन टप्पे करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रूपये दर आकारण्यात येईल. रूग्णालयात, कोविड सेंटरमध्ये किंवा क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळेतून सॅम्पल गोळा करून तपासणी करण्यासाठी 1 हजार 400 रूपये तर, रूग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रूपये असा कमाल दर निश्चित कण्यात आला आहे, असेही टोपे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या