Sachin Vaze Case: सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकार व अनिल देशमुखांना मोठा धक्का

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

सर्वोच्च न्यायालयाने यावेळी महाराष्ट्रातील बडे अधिकारी या प्रकरणांमध्ये गुंतले असल्याचा उल्लेख केला आहे. 

नवी दिल्ली: मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या विरोधात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारने स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या. सर्वोच्च न्य़ायालयाने याचिका फेटाळल्याने सीबीआय चौकशी सुरु राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यावेळी महाराष्ट्रातील  बडे अधिकारी या प्रकरणांमध्ये गुंतले असल्याचा उल्लेख केला आहे. अनिल देशुमख यांची सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहीजे. फक्त एका पोलिस अधिकाऱ्याने काही म्हटलं म्हणून त्याचे शब्द हे पुरावा ठरु शकत नाहीत. (Sachin Vaze Case Supreme Courts big blow to Thackeray government and Anil Deshmukh)

यावर सर्वोच्च न्यायालयाने, आरोप करणारे ( अनिल देशमुख) हे तुमचे शत्रू नव्हते. परंतु आरोप अशा व्यक्तीने केले आहेत जो जवळपास तुमचा राईट हॅन्ड माणूस होता असं सांगितलं आहे. तसेच अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांची चौकशी झाली पाहीजे असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालमध्ये दाखल केली होती.

महाराष्ट्रात कोरोनाचा आलेख वाढताच; आज आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक नवे रुग्ण 

त्यावर सीबीआयने 15 दिवसामध्ये प्राथमिक चौकशी करुन अहवाल मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. उच्च न्यायालयाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशाविरोधात अनिल देशमुख आणि ठाकरे सरकार यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्वतंत्र याचिका मांडल्या होत्या. आणि या याचिकांवर तातडीने सुनवाणी घेण्याची विनंती केली होती.  
 

संबंधित बातम्या