मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंची अटक; तर राम कदम यांच्याकडून नार्को टेस्टची मागणी  
Sachin Waze

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंची अटक; तर राम कदम यांच्याकडून नार्को टेस्टची मागणी  

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीसंदर्भात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएने सचिन वाझे यांना आज ताब्यात घेतले असून, त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा उलघडा अजून झालेला नाही. मात्र सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राजकीय टीका टिपण्यानं चांगलाच जोर चढला आहे. 

मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारविरोधात भाजपने मोर्चा उघडला आहे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजपचे नेते राम कदम यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवरून केली आहे. सचिन वाझे यांच्या अटकेच्या प्रकरणात राम कदम यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की अखेर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. आणि याशिवाय सचिन वाझे यांना वाचविण्याचा गुन्हा करणाऱ्या शिवसेना सरकारने देशाची माफी मागून सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करेल का? असा प्रश्न देखील राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सचिन वाझे यांनी नार्को टेस्ट करुन घ्यावी जेणेकरुन महाराष्ट्र सरकार त्यांना का वाचवू इच्छित आहे हे त्यांना ठाऊक होईल, असे राम कदम यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.   

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएस करत आहे. आणि यासंदर्भात तपास काहीच हाती लागले नसल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय मनसुख हिरेन यांचा मोबाईल हा या चौकशीत महत्वाचा दुवा ठरू शकतो. मात्र त्यांचा मोबाईल अजून सापडलेला नसून, त्यांच्या मृत्यूनंतर देखील मोबाईल सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे 

दरम्यान, गेल्या महिन्यात 25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एक स्फोटकांनी भरलेली संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. आणि या घटनेच्या एका आठवड्यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे मागील चार महिन्यांपासून ही गाडी चालवत होते. व मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ही कार आढळून आल्यानंतर देखील सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. यामुळेच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूला सचिन वाझे जबाबदार असल्याची भूमिका हिरेन यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे. याव्यतिरिक्त, मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने एफआयआरमध्ये सचिन वाझे यांचे नाव घेतल्यामुळे विरोधी पक्षांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. इतकेच नाही तर, सचिन वाझे यांनी शुक्रवारी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण पुरेसे पुरावे असल्याचे सांगत ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.    

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com