सचिन वाझे यांना दोन आठवड्यांची एनआयए कोठडी  

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 मार्च 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या मोटारीच्या चौकशीच्या संदर्भात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) आज पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना न्यायालयात हजर केले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या मोटारीच्या चौकशीच्या संदर्भात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) आज पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर, न्यायालयाने सचिन वाझे यांना 25 मार्च पर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली आहे. स्थानिक रुग्णालयात आरोग्य तपासणी केल्यानंतर सचिन वाझे यांना दक्षिण मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. काल सचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या मोटारीच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. 

Assam Election : ''आगामी पाच वर्षात आसामला घुसखोरीपासून मुक्त करू...

शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता दक्षिण मुंबईतील कम्बाला हिलमधील एनआयए कार्यालयाने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना समन्स जारी केले होते. त्यानंतर एनआयएच्या अधिकार्‍यांनी सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना भारतीय दंड संहिता आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलमांतर्गत अटक केली. व आज सचिन वाझे यांना एनआयएने न्यायालयात हजर केल्यानंतर 25 मार्च पर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, गेल्या महिन्यात 25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एक स्फोटकांनी भरलेली संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. आणि या घटनेच्या एका आठवड्यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे मागील चार महिन्यांपासून ही गाडी चालवत होते. व मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ही कार आढळून आल्यानंतर देखील सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली होती.       

संबंधित बातम्या