''आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आले''

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

सचिन वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात सुनावली आहे.

मुबई: उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार आणि मनसुख हिरेन(Mansukh Hiren) खून प्रकरणात मुंबई पोलिस निलंबित अधिकारी सचिन वाझे(Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली होती. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते.  एनआयए कोर्टाने आता पुन्हा सचिन वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात सुनावली आहे. गुरुवारी  सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात सांगितले की, आपला या गुन्ह्याशी काहीही संबंध नसून या प्रकरणात आपल्यला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. (Sachin Wazes statement to NIA)

मुंबई पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. कोठडीची कालावधी संपल्यानंतर वाझे यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. एनआयएने न्यायालयात वाझे यांच्या विरोधात युएपीएचे कलम लावून 15 दिवसांची कोठडी मागितली. तर  सचिन वाझे यांनी सुनावणीदरम्यान न्यायाधीश पी पी सितार यांना सांगितले की, "मला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मी केवळ दीड दिवस या प्रकरणातील तपास अधिकारी म्हणून काम करत होतो आणि माझ्या स्वत: च्या क्षमतेनुसार मी माझे काम केले. मात्र अचानक काहीतरी अनपेक्षित घडले. मी स्वतः एनआयएच्या(NIA) कार्यालयात गेलो आणि मला अटक करण्यात आली." तसेच आपण न्यायालयात कोणताही गुन्हा कबूल केलेला नाही, असेही सचिन वाझे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने 20 मार्च रोजी या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए कडे सोपवला होता. तरी एटीएस सुद्धा या प्रकरणावर तपास करत होते.  बुधवारी न्यायालयाने वाझे  प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणावर सुरु असलेला तपास एटीएसने थांबवावा तसेच या तपासातील सर्व पुरावे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे सोपवावे असे आदेश एटीएसला दिले आहेत.

परमबीर सिंग प्रकरणात शरद पवारांच्याच चौकशीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका

संबंधित बातम्या