Mansukh Hiren Case : सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ 

दैनिक गोमन्तक
शनिवार, 3 एप्रिल 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी आणि या कारचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी आणि या कारचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. एनआयएच्या पथकाने आज सचिन वाझे यांना न्यायालयात हजर केले. यावेळी एनआयएच्या वतीने बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सचिन वाझे यांच्या एनआयएच्या कोठडीत आणखी सहा दिवस वाढ करण्याची मागणी केली होती. (Sachin Wazes NIA custody extended by court)

एनआयएच्या वतीने बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयात सीआरपीसीच्या कलम 27 नुसार सचिन वाझे यांच्या खुलास्यानंतर मिठी नदीतून पुरावा मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर सचिन वाझे यांच्या घरातून पासपोर्ट मिळाला असून परंतु तो सचिन वाझे यांचा नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. या पासपोर्ट संदर्भातचा तपास आणि वर्सोवातील डीसीबी बँकेत सचिन वाझे आणि एक सहकारी आरोपीचे संयुक्त बँक खाते आढळल्याची माहिती एनआयएने न्यायालयात दिली. शिवाय, या खात्यावर 1 मार्च रोजी 26.5 लाख रुपये होते. तसेच याच शाखेत संयुक्त लॉकर देखील असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. 

मोठा निर्णय! पहिली ते आठवीचे विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात; तेही परीक्षेविना

तर दुसरीकडे सचिन वाझे यांच्या वकिलाने न्यायालयात सचिन वाझे यांनी एनआयएकडे असा कोणताच खुलासा केला नसल्याचे न्यायालयात सांगितले. तसेच, सर्व नियोजित असून मिठी नदी ही एक लांब आणि खोल आहे. त्यामुळे या नदीत काहीतरी सहजपणे मिळणे फार अवघड असल्याचे सचिन वाझे यांच्या वकिलांनी न्यायालयात पुढे स्पष्ट सांगितले. याशिवाय, या सर्व गोष्टी 28 मार्च रोजी सापडल्या आहेत. परंतु, याबाबतीत मागील पाच दिवसांपासून कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे सचिन वाझे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. 

यानंतर, मुंबईतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने आज सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत 7 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिवाय, न्यायालयाने एनआयएला सचिन वाझे यांना सर्व वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश आज दिले आहेत.     

संबंधित बातम्या