Mansukh Hiren Case : सचिन वाझेंना न्यायालयाचा झटका; एनआयए कोठडीत केली वाढ  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 मार्च 2021

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या मोटारीच्या चौकशीच्या संदर्भात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या मोटारीच्या चौकशीच्या संदर्भात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी, दक्षिण मुंबईतील न्यायालयाने सचिन वाझे यांना 25 मार्च पर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली होती. याचा कार्यकाळ आज संपत होता. त्यानंतर आज मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात सचिन वाझे यांना हजर करण्यात आले. व न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. 

राज्यात कोरोनाचा हाहाकार! एका दिवसांत 28,699 रुग्णांची नोंद; मृत्यूसंख्याही...

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार आणि या मोटारीचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात एनआयए 13 मार्च रोजी मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांना अटक केली होती. व त्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी 25 मार्च पर्यंत एनआयए कोठडीत केली होती. याचा अवधी आज संपल्यानंतर एनआयए सचिन वाझे यांना पुन्हा मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात हजर केले. यावेळेस न्यायालयाने सचिन वाझे यांची 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी वाढविली आहे. 

दरम्यान, गेल्या महिन्यात 25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एक स्फोटकांनी भरलेली संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. आणि या घटनेच्या एका आठवड्यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे मागील चार महिन्यांपासून ही गाडी चालवत होते. व मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ही कार आढळून आल्यानंतर देखील सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली होती.   

संबंधित बातम्या