सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिल पर्यंत वाढ  

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एनआयए) निलंबित मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा आणखी दोन दिवसांचा रिमांड ची परवानगी मिळाली आहे.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एनआयए) निलंबित मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा आणखी दोन दिवसांचा रिमांड ची परवानगी मिळाली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने वाजे यांना  9 एप्रिलपर्यंत रिमांडवर पाठवले आहे. या कालावधीत कोर्टाने सीबीआयलाही वाजे यांची चौकशी करण्याची परवानगीही दिली आहे. अटकेची मुदत संपल्यानंतर एनआयएने बुधवारी वाझे यांना विशेष न्यायालयात हजर केले होते.  (Sachin Waze's NIA remand extended till April 9) 

महाराष्ट्रात कोरोना स्फोटानंतर स्विगी आणि झोमॅटो रात्री 8 नंतर बंद

एनआयएने सचिन वाजे यांची  आणखी  4 दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. यावर, एनआयएने सचिन वाझे यांच्या मागणीला विरोध  करणार नसल्याचे सांगितले. तसेच ते सीबीआयच्या तपासातही सहकार्य करण्यास तयार आहेत, अशी माहिती सचिन वाझे यांच्या वकिलाने दिली होती.  परंतु, सचिन वाझे यांना बेड्या घालून सीएसएमटी स्थानकात नेल्याबबत त्यांनी आक्षेप नोंदवला. त्याचबरोबर,  मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेल्या निलंबित मुंबई पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि नरेश धरे यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणीही एनआयएने केली होती. 

महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परप्रांतीय कामगार जबाबदार : राज ठाकरे 

दरम्यान, देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकणी भरलेली कार उभी करण्यासंबंधी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयए सचिन वाझे यांची चौकशी करीत आहे. सचिन वाझे यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. अटकेनंतर एनआयए कोर्टाने वाजे यांना 25 मार्चपर्यंत एनआयएच्या रिमांडवर पाठविले होते. त्यात 3 एप्रिल वाढ करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा त्यात 7 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या