ठाकरे सरकार दारुडे; माजी मंत्र्यांची जहाल टीका

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने घातलेल्या निर्बंधांवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सांगली: कोरोना साथीच्या काळात दारूची दुकाने सुरू केली आणि शिवजयंतीच्या पर्वावर शहरांमध्ये निर्बंध लावले म्हणून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने घातलेल्या निर्बंधांवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ठाकरे सरकार दारुडे आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये या सरकारने दारूतून जास्त कर मिळतो म्हणून दारूची दुकाने सुरू केली आणि मंदिरे बंद ठेवली, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कोरोना वाढला आहे असे सरकार आता सांगते आहे. 6 महिने कोरोना कुठे झोपला होता? 6 महिन्यात तुम्ही चाचण्याच घेतल्या नाही का? अधिवेशन जवळ आले आहे. विरोधी आमदार जनतेचे प्रश्न मांडणार ,सरकारमसोर मांडणार आहेत, त्याला तोंड द्यावे लागणार म्हणून राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे का? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
दरम्यान सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींकडेही आपला मोर्चा वळविला आणि त्यांनाही जोरदार टोला लगावला आहे. “अमोल मिटकरी यांनी माझ्यावर आरोप केला होता की मी दारु विकली. मी सांगतो की, मी गांजाही विकत होतो; तू येणार का चिलीम लावायला?” असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांना चोख उत्तर दिले आहे.

संबंधित बातम्या