शिर्डीत भक्तांना ‘या’ वेळेतच घ्यावे लागणार साई दर्शन

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात नाइट कर्फ्यू लावल्यानंतर संस्थानाने हा निर्णय घेतला असल्याचे देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.

शिर्डी: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रसार नागरिकांची तसेच सरकारची चिंता वाढवत आहे. लॉकडाऊन नंतर राज्यातील एक- एक क्षेत्रे खुली केली जात असतानाच कोरोनाचा पुन्हा नव्याने प्रसार वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानाने साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एखदा नियम बदले आहेत. आता भक्तांना साई दर्शन सकाळी 6 ते  रात्री 9 या वेळेतच घेता येणार आहे. तर रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत भक्तांसाठी साई संस्थान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात नाइट कर्फ्यू लावल्यानंतर संस्थानाने हा निर्णय घेतला असल्याचे देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.

दिल्लीत कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये कोरोना पिडीतांचा आकडा वाढू लागला आहे. राज्य सरकारने केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची चाचणी करुन येण्याचा आदेश काढला होता. महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यात पुन्हा एखदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मार्च महिन्यात या तारखांना बंद राहणार महाराष्ट्रातील बॅंका

यावेळी साई संस्थानाने दर्शनाच्या वेळेसोबतच भाविकांवर इतरही काही निर्बंध नव्याने घातले आहे. यामध्ये सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. गुरुवारी असणारी साई पालखीचे दर्शनही भक्तांना घेता येणार नाही. गुरुवार, शनिवार, रविवार, तसेच साई उत्सवाच्या दिवशी बायोमेट्रीक पासही बंद ठेवण्यातील येतील, अशा काही नियमांचा समावेश साई संस्थानाने केला आहे.

      

संबंधित बातम्या