कंगना राणावतच्या पाठीशी संघ परिवार

पीटीआय
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

मुंबई महापालिकेच्या कारवाईवर टीका; वादात घेतली उडी

नवी दिल्ली: मुंबईला पाकव्याप्त काश्‍मीरची उपमा देणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिचे बेकायदा बांधकाम मुंबई महापालिकेने आज पाडून टाकल्यानंतर निर्माण झालेल्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारानेही उघडपणे उडी घेतली आहे. ‘असत्याच्या 
हातोड्याने सत्याचा पाया डळमळीत होत नाही’, अशा शब्दांत संघाने निषेध केला आहे.
भाजपने या कारवाईचे वर्णन ‘एका अपरिपक्व सरकारची बालीश कृती’ असे केले आहे. संघाचे अखिल भारतीय सहप्रमुख रामलाल यांनी ट्विटद्वारे कारवाईबद्दल तीव्र नापसंती व्क्त केली. ‘असत्याच्या हातोड्याने सत्याचा पाया डळमळीत होत नाही’ असे ट्विट रामलाल यांनी केले. रामलाल यांच्याशिवाय भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी व पक्षनेते तेंजिदरसिंग बग्गा यांनीही कंगनाला उघड पाठिंबा दिला आहे. 

हा तर महाराष्ट्राचा अपमान : फडणवीस 
कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्याने महाराष्ट्र सरकारचा किंवा राज्याच्या पोलिसांचा जेवढा अपमान होतो तेवढाच अपमान सरकार जी कारवाई करत आहे त्यामुळे होतो आहे. राज्य सरकारच्या या तोडफोडीच्या कृतीमुळे साऱ्या देशात महाराष्ट्राचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाजू मांडली आहे. 

संबंधित बातम्या