संजय राठोड पोहरादेवीला पोहोचले; काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनी महाराष्ट्रासमोर आले.

बीडमधील पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनी महाराष्ट्रासमोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर वनमंत्री राठोड गायब झाले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड य़ांचे नाव सर्वांसमोर आले होते. यामुळे राज्यातील वातावरण चांगलं तापलं होतं. भाजपने सरकारवर हल्लाबोल करत वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रथमच संजय राठोड सर्वांसमोर आले असून ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहचले आहेत.

महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे गोव्यात रेती वाहतूक करणारे ट्रक ताब्यात

वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार असल्याचे समजताच राठोड यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. पोहरादेवी परिसरात समर्थकांनी मोठी गर्दी केल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संजय राठोड आपल्या कुटुंबीयासमवेत पोहरादेवी दर्शनासाठी पोहचले आहेत. इथे आल्यानंतर बंजारा समाजाला उद्देशून भाषण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एवढ्या दिवस गप्प असणारे वनमंत्री संजय राठोड काय बोलणार याची उत्सुकता आहे.

कोरोनाचे नियम सगळ्यांसाठी सारखेच; माजी खासदार धनंजय महाडिकांवरही गुन्हा दाखल

पूजा चव्हाण हिने पुण्यात 7 फेब्रुवारीला पुण्यातील हडपसर भागातील महमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्य़ा केली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी या आत्महत्येचा आणि महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली होती. प्रेमसंबंधामधूनच पूजाने आत्महत्यासारखं पाऊल उचलंल असल्याचे बोलले जात होते. यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.    
 

संबंधित बातम्या