काळा इतिहास 2014 नंतरचा; मग खरा इतिहास कधीचा? संजय राऊत
Sanjay RautDainik Gomantak

काळा इतिहास 2014 नंतरचा; मग खरा इतिहास कधीचा? संजय राऊत

आज शोध पत्रकारितेची (Investigative Journalism) संकल्पना मागे पडली आहे.

औरंगाबाद: राजधानी दिल्लीतमधील (Delhi) ऐतिहासीक संसद भवनला इतिहास आहे. आपण संसद भवनामध्ये स्वातंत्र्याचा स्विकार केला आहे. संसद भवनाची (Parliament) इमारत आणखी शंभर वर्षापर्यंत आहे तशी राहील. आणि ही इमारत मोडुन इतिहास पुसण्याचा प्रयत्न सद्या केला जात हे. मात्र 2014 नंतर काळा इतिहास आहे. आणि खरा इतिहास हा 2014 पुर्वीचाच आहे असा टोला केंद्र सरकार आणि अभिनेत्री कंगनाला खा.संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना नेते खा.संजय राऊत (Sanjay Raut) MGM महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. आता देशातील काही उद्योजक रोजच मध्यम विकत घेत आहेत.

Sanjay Raut
'महागाई ही राष्ट्रीय समस्या': संजय राऊत

पुढे बोलताना राऊत म्हणाले, देशातचा चौथा स्तंभ विकला जात आहे. हे थांबणे गरजेचे आहे. परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे सामना कोणीही विकत घेऊ शकत नाही. तसेच पत्रकारांनी लिहीत राहावे. तसेच संपादकांनी त्यांची भूमिका सतत आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडावी.

आज शोध पत्रकारितेची संकल्पना मागे पडली आहे. एखादा येतो आणि सांगतो की याची वाजायची असून तो एक फाईल आणून देतो. त्यातून बातमी केली जाते. आणि अश्या बातम्या आता पुरस्कार मिळू लागले आहेत. यामुळेच शोध पत्रकारिता राहिलेली नाही. असे खा.राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com