Sanjay Raut: 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ED च्या ताब्यात

Maharashtra News: शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने (Directorate of Enforcement) साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak

Directorate of Enforcement: शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने (Directorate of Enforcement) साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळी 7 वाजता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडुप येथील बंगल्यावर पोहोचले होते. तेव्हापासून अधिकारी त्यांच्या घरी होते. काही वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या अटकेची भीती व्यक्त केली होती. आता अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी दोनदा बोलावूनही संजय राऊत (Sanjay Raut) ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यानंतर ईडीचे (ED) पथक आज पहाटे त्यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते. ईडीने सुमारे पाच तास घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी केली होती. त्यासंबंधीची चेक लिस्टही त्यांना देण्यात आली होती.

Sanjay Raut
'बंडखोरांना पाठिंबा देऊन विधानसभा- लोकसभा अध्यक्षांनी...', Sanjay Raut चां आरोप

त्याचबरोबर, संजय राऊत यांचे वकीलही ईडी अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. याप्रकरणी ईडीची टीम महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी करत आहे. या कारवाईबाबत संजय राऊत यांनी ट्वीट करत खोटे पुरावे सादर करुन आपल्यावर खोटी कारवाई केली जात असल्याचे म्हटले होते.

Sanjay Raut
Sanjay Raut On ED Summon: ED समोर हजर होण्यापूर्वी संजय राऊतांनी ट्विट करत शिवसैनिकांना केले आवाहन

संजय राऊत यांनी ट्विट करत निशाणा साधला

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'खोटी कारवाई... खोटे पुरावे, मी शिवसेना (Shiv Sena) सोडणार नाही. मी मेलो तरी शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र... महाराष्ट्र आणि शिवसेनेचा लढा सुरुच राहील.' एवढेच नाही तर पक्षाचे चिन्ह देखील राऊत यांनी ट्विट केले होते. त्यासोबत त्यांनी लिहिले होते की, 'तरीही शिवसेना सोडणार नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com