Maharashtra: 'संजय राऊत अर्धे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या वारशावर आमचा दावा'

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना समर्थक गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Dainik Gomantak

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना समर्थक गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केसरकर म्हणाले की, 'संजय राऊत अर्धे शिवसैनिक आणि अर्धे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत.'

दरम्यान, दीपक केसरकर यांनी बुधवारी साईबाबांच्या आरतीला उपस्थित राहिल्यानंतर हा निशाणा साधला. यावेळी दीपक केसरकर यांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत सत्यमेव जयते म्हटले. शेवटी सत्याचाच विजय होईल, असेही ते म्हणाले. शिवसेनेवरील दाव्यादरम्यान दीपक केसरकर म्हणाले की, 'आम्ही कधीही मातोश्री आणि शिवसेना भवनावर दावा केलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जोडण्यातच आमचा सन्मान आहे.'

Sanjay Raut
Maharashtra Politics: उध्दव ठाकरेंना जोर का झटका! आमदारानंतर आता खासदारांची बंडखोरी

दुसरीकडे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बचाव करताना दीपक केसरकर म्हणाले की, 'ते सर्वसामान्य शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे विचार शिवसैनिकांना शिकवावेत एवढा मोठा मी नाही. तर मातोश्रीचे मोठेपण जपण्यासाठी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) गरज आहे. कधीकधी आपण आपल्या सभोवतालच्या गोंधळाकडे लक्ष दिले पाहिजे. मी एकटा असलो तरी काँग्रेससोबत जाणार नाही, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्यासोबत आम्ही पुढे जात आहोत. काँग्रेसपुढे झुकायचे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.' केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करुन दिली.

Sanjay Raut
Maharashtra Politics: 'शिवसेना हा गट नसून...', संजय राऊतांचा घणाघात

यापूर्वीही शिंदे गटाने संजय राऊत यांना दूर ठेवण्याची मागणी केली होती

एकनाथ शिंदे गटाकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. संजय राऊत स्वबळावर एकही निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा पुनरुच्चार शिंदे गटाच्या नेत्यांनी अनेकदा केला. एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटीतील मुक्कामात म्हटले होते की, उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना बाजूला ठेवले तर आम्ही येऊन बोलायला तयार आहोत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com