'हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार आहे'

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी काल रवाना झाले होते. मात्र, रसत्यावरच त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांबरोबर पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी  पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली.

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हे हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी काल रवाना झाले होते. मात्र, रसत्यावरच त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांबरोबर पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी  पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. यावरून विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  

 यावर तिखट प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले,"हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार" आहे. संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणारे नाही. एका मुलीवर बलात्कार झाल्यावर तिचा निर्घृण खूनही करण्यात आला  याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवायचा नाही?, असेही ते म्हणाले.
 ही कोणती लोकशाही आहे,  हा प्रकार म्हणजे देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे', अशी संतप्त प्रतिक्रियाही यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या