फडणवीसांच्या आरोपांवर राऊत म्हणाले, हमाम मे सब...

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

सचिन वाझे प्रकरणावर आज राज्यातल्या महत्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.

सचिन वाझे प्रकरणावर आज राज्यातल्या महत्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. केंद्र सरकारचीच तपास यंत्रणा सचिन वाझे प्रकरणावर तपास करत आहे, तेव्हा विरोधी पक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणेवर विश्वास ठेवावा, असे संजय राऊत म्हणाले. याशिवाय, जर सचिन वाझे यांच्याकडून गुन्हा झालेला असेलच तर त्यांच्या या चुकीमुळे सरकार पडत नसते, असे सांगितले.    

राहुल गांधी कुठल्या ग्रहावरून आलेत म्हणत प्रकाश जावडेकरांचा पलटवार 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सचिन वाझे व राज्य सरकारने नव्याने नियुक्त केलेल्या मुंबई पोलीस संदर्भात पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. सचिन वाझे आणि परमवीर सिंह हे फक्त प्यादे असून त्यांच्या मागे कोण आहे याची चौकशी केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगेचच दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. व त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर तोफ डागली.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला...

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना, एका दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुणाची चौकशी करत असताना त्याचा मृत्यू झाला होता, आणि त्याच प्रकरणात यापूर्वी सचिन वाझेंचे निलंबन झाल्याची माहिती दिली. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांना दहशतवादाशी संबंधित तरुणाच्या मृत्यूचे  दुःख झाले होते का? असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी यावेळी विचारला. यानंतर वसुली प्रकरणात सचिन वाझेंचा सहभाग असल्याच्या आरोपा बद्दल बोलताना, कोण कुठे वसुली करतो हे सर्वाना चांगलेच माहिती असल्याचे संजय राऊत म्हणाले. व शेवटी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत "आखिर हमाम मे सब नंगे होते है" असा टोला देखील विरोधकांना लगावला.

 

संबंधित बातम्या