'महागाई ही राष्ट्रीय समस्या': संजय राऊत

औरंगाबादमध्ये (Aurangabad) काढलेल्या मूकमोर्चादरम्यान संजय राऊत बोलत होते.
'महागाई ही राष्ट्रीय समस्या': संजय राऊत
Sanjay RautDainik Gomantak

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलेच गाजत आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या आहेत. पेट्रोल-डिझेल वाढत्या दरामुळे राज्यातील नेते मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. असे म्हणत वाढत्या महागाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून काढलेल्या मूक मोर्चादरम्यान संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, ''महागाईमुळे देशातील सामान्य नागरीक भरडला जात आहे. महागाई ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे तब्बल 17 हजार व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार निजामशाहीचं सरकार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा सातत्याने केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. राज्यात अस्थिरता वाढविण्याचा प्रयत्नही मोदी सरकार करत आहे. महाराष्ट्रात दंगली पेटविण्याचे काम काही राजकीय नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. पहिल्यांदा महाराष्ट्राला आग लावायची आणि नंतर सरकारला काम करता येत नाही म्हणून बोंब ठोकायची हे कदापि आम्ही सहन करणार नाही. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे मोदी सरकारने आश्वासन दिले होते ते कुठे गेले? तुम्ही कितीही राज्यात कारस्थाने करा आम्ही तुमच्या छाताडावर चढून त्याला उत्तर देऊ.''

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)....

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com