Maharashtra Politics: 'शिवसेना हा गट नसून...', संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut: खासदारांचा पूर्णपणे पाठिंबा हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना आहे.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. पहिल्यांदा हातून सत्ता गेली, तर आता पक्ष वाचवण्याची धडपड सुरु झाली आहे. ज्यामध्ये रोज नव-नवे ट्विस्ट येत आहेत. आता एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे गटाने जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली. शिवसेनेच्या प्रमुख नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. याच पाश्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अनेक मोठे खुलासे केले आहे. सध्याच्या घडामोडीवरही त्यांनी भाष्य केले.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ''शिवसेनेच्या संपूर्ण खासदारांचा पाठिंबा हा पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना आहे. हा जो राजकीय घटनाक्रम सुरु आहे तो कॉमेडी सीजन नंबर एक आहे. लवकरच सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांच्या बरखास्तीचा निर्णय जाहीर करणार आहे. शिवसेना (Shiv Sena) सोडून गेलेल्यांपेक्षा अधिक भक्कम आहे. शिवसेना हा नोंदणीकृतद राजकीय पक्ष आहे. एकनाथ शिंदे गटाला आमची कार्यकारणी बरखास्त करण्याचा काही एक अधिकार नाही.''

Sanjay Raut
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या तारखेत बदल

शिंदे गटाच्या बैठकीला शिवसेनेचे अनेक खासदार उपस्थित होते

याशिवाय, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बैठकीत शिवसेनेचे 13-14 खासदार ऑनलाइन हजर झाल्याचेही सूत्रांच्या हवाल्याने वृत्त आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच शिवसेनेचे 55 आमदार दोन गटात विभागले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर 15 आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहेत. त्याचवेळी आता शिंदे गटाने 12-14 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठकही घेतली

आठवडाभरापूर्वी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक झाली. शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. या बैठकीला शिवसेनेचे 18 पैकी 13 लोकसभा सदस्य उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानी झालेल्या बैठकीला 18 पैकी 15 लोकसभा सदस्य उपस्थित असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Sanjay Raut
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

खासदारांच्या सूचनेनंतर द्रौपदी मुर्मूला पाठिंबा जाहीर करण्यात आला

मात्र, खासदारांच्या सूचनेनंतर उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. आधीच बंडखोर आमदारांमुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून सत्ता गेली आहे. त्यामुळेच त्यांना आता पक्ष वाचवण्यासाठी खासदारांचा पाठिंबा हवा आहे. महाराष्ट्रातील 18 लोकसभा खासदारांव्यतिरिक्त कलाबेन डेलकर या दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून शिवसेनेच्या खासदार आहेत. त्याचवेळी राज्यसभेत शिवसेनेचेही तीन खासदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com