भाजपच्या सगळ्या नत्यांनी डोळ्याचे नंबर चेक करा: संजय राऊत

चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
BJP
BJPDainik Gomantak

चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, अशी टीका करतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी गोव्याच्या निवडणुकीवरही भाष्य केले, गोव्यात काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते. ती अजून उतरलेली दिसत नाही. माझं आतापर्यंत काँग्रेस नेते वेणुगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी बोलणं झालं होत, पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे, अशी टीका त्यांनी केली. उद्या तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) काही नेत्यांशी भेट होणार असून त्यात गोव्याच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय? चीन आतमध्ये घुसत आहे. यावर भाजपनं बोलावं सीमेवर गंभीर परिस्थिती आहे, असं ते म्हणाले. तसेच पंतप्रधानांच्या कालच्या बैठकीला ज्यांच्याकडे सूत्र आहेत ते आरोग्यमंत्री उपस्थित होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राकेश टिकेत लढाई संपवून घरी गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सूचनेनुसार मी त्यांना भेटलो, मात्र या भेटीतील चर्चेचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरही भाष्य केले. उत्तर प्रदेशात आम्ही 50 जागा लढणार आहोत, असं सांगत राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला.

एमएमआयचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांननी मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी केली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खर्च द्यायचा की नाही ते आम्ही पाहू. तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्राच्या मातीचे खाता, मराठी मातीचा श्वास घेता, पण ही वक्तव्य म्हणजे याला बेइमानी म्हणतात. शिवसेनेचा जन्म हा मराठी अस्मितेच्या प्रश्नावर झालाय, ही भाषा दक्षिणेत जाऊन करा. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com