Maharashtra Political Crisis: गुलाबराव पाटलांचा 'तो' व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांची जहरी टिका

Sanjay Raut: मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊत यांनी टिका केली आहे
Sanjay Raut Shared Gulabrao Patil Video | Sanjay Raut Tweet
Sanjay Raut Shared Gulabrao Patil Video | Sanjay Raut TweetDainik Gomantak

महाराष्टामध्ये सत्तासंघर्षाचा पेच शिगेला पोहतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बंडखोरांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊत यांनी जहरी टिका केली आहे. (Sanjay Raut Shared Gulabrao Patil Video)

संजय राऊतांनी ट्वीट करत म्हटलंय की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.(Sanjay Raut Tweet)

Sanjay Raut Shared Gulabrao Patil Video | Sanjay Raut Tweet
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग; बंडखोर शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

* व्हिडीओत काय म्हटलंय
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका भाषणाचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये गुलाबराव पाटील म्हणत आहेत. शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. 'कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है', असं गुलाबराव पाटील या व्हिडीओत म्हणत आहेत.

यासोबत शिवसेनेचे मुखपत्र असलेला सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. राजकीय विरोधकांविरोधात खोटे आरोप करणाऱ्या , धमक्या देणाऱ्या भाजपपुरस्कृत मंडळींना 'वाय'पासून 'झेड'पर्यंत सुरक्षा देण्याचा सपाटाच केंद्रातील भाजप सरकारने लावला आहे, असा थेट आरोप सामनाच्या माध्यमातून शिवसेनेनं केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com