कोकणच्या विकासाची दिशा ठरवली जाणार: शरद पवार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने येताना आंबोली नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली,

सावंतवाडी : गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने येताना आंबोली नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली, त्या वेळी त्यांचे कोल्हापुरातील नेत्यांनी स्वागत केले.

स्थानिक लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी सिंधुदुर्गात राबविण्यात आलेल्या फलोत्पादन योजनेत सातत्य राहण्यासाठी  प्रयत्न करावेत, त्यासाठी आवश्‍यक निधी दिला. तेव्हा येथिल लोकप्रतिनिधींनी नियमीत प्रयत्न करत राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सावंतवाडी  येथे केले.

पंचतारांकित हॉटेल उभी राहत असल्याने आता त्याचा फायदा होणार आहे जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होत आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटन वाढीसाठी आवश्‍यक असलेले सहकार्य आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून नक्कीच करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मद्यपी पर्यटकांचे गोवा सरकारला आव्हान... -

कोकणातील  मच्छीमारी, कृषी फलोत्पादन, पर्यटन या माध्यमातून विकास साधत असतांना आणखी कोकणाच्या विकासाला गती मिळाली पाहिजे अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. सायन्स टेक्नॉलॉजी माध्यमातून विकासाचे नियोजन केले जाईल असेही त्यानी सांगितले. 

यावेळी पवार काही काळ आंबोली येथे थांबले.  त्याठिकाणी उपस्थित पत्रकारांनी त्यांना प्रश्‍न केले असता त्यांनी ही माहिती दिली. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर डान्टस, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, चित्रा बाबर-देसाई, हिदायतुल्ला खान आदी पवारांसोबत पस्थित होते. दरम्यान बांदा येथे त्यांचे ‘राष्ट्रवादी’ तर्फे स्वागत करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक ही महाराष्ट्राला आदर्श अशी बॅंक आहे. तिचा ‘एनपीए’ शून्य असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या कामाचे कौतुक केले. यावेळी पवार यांनी कोल्हापूर, सिंधुदुर्गातील राजकारणाच्या संदर्भात माजी राज्यमंत्री भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे संचालक व्हिक्‍टर डान्टस, तालुकाध्यक्ष दळवी यांच्याशी चर्चा केली. आपण नवीन काही करू शकतो का, याबाबतही त्यांनी माहिती घेतली. या चर्चेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे विशेष कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे काम महाराष्ट्राला आदर्श असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

संबंधित बातम्या