भारत-चीन सीमेवरील संघर्षात जवान सचिन जाधव हुतात्मा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

लष्कराच्या मुख्यालयाकडून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला आलेल्या पत्रात सचिन जाधव हे चकमकीत हुतात्मा झाल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याविषयी तपशील समजू शकला नाही.

सातारा: येथील दुसाळेचे (ता. पाटण) जवान सचिन संभाजी जाधव (नाईक) (वय ३८) यांना लेह-लडाखमध्ये वीरमरण आले. उद्या (शनिवारी) दुसाळेत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. ही बातमी कळताच तारळे विभागासह दुसाळे गावावर शोककळा पसरली आहे. 

लष्कराच्या मुख्यालयाकडून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला आलेल्या पत्रात सचिन जाधव हे चकमकीत हुतात्मा झाल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याविषयी तपशील समजू शकला नाही. सचिन हे २००२ मध्ये सैन्यात भरती झाले होते. २०१८ मध्ये त्यांचा लष्कराबरोबरचा बाँड संपला होता. मात्र, अजूनही देशसेवा करण्यासाठी त्यांनी दोन वर्षे सेवा वाढविली होती. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या