सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात UG-PG साठी अर्ज प्रक्रिया सुरू, असा असेल पेपर पॅटर्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात UG-PG साठी अर्ज प्रक्रिया सुरू, असा असेल पेपर पॅटर्न
Savitribai Phule Pune University | Registration for UG & PGTwitter

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणूनच, जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा इंटिग्रेटेड प्रोग्राम्स (SPPU UG PG Admissions 2022) मध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. यासाठी, पुणे विद्यापीठाचा अधिकृत वेबसाइट unipune.ac.in वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता. (Pune University Admissions 2022)

महत्त्वाच्या तारखा -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेश 2022 च्या ऑनलाइन नोंदणीसाठी यूजी, पीजी आणि इंटीग्रेटेड प्रोग्राम्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2022 आहे . तर 17 जुलै रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येतील .

Savitribai Phule Pune University | Registration for UG & PG
महाराष्ट्र SSC च्या निकालाची तारीख बदलली; असा पाहा निकाल

या तारखेला होणार प्रवेश परीक्षा –

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेणार आहे. 21 जुलै ते 24 जुलै 2022 या कालावधीत प्रवेश परीक्षा घेतली जाईल .

Savitribai Phule Pune University | Registration for UG & PG
अशी केली जाईल 'अग्निपथ' योजनेअंतर्गत 'अग्निवीरांची' भरती?

हा असेल पेपर पॅटर्न

जर आपण प्रवेश परीक्षेच्या स्वरूपाबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर ही परीक्षा दोन तासांची असेल आणि पेपरमध्ये फक्त दोन विभाग असतील. पहिला विभाग म्हणजे विभाग A हा सामान्य ज्ञान, योग्यता, तर्कशास्त्र आणि आकलनाचा असेल. तर विभाग B मध्ये विषयकेंद्रित प्रश्न विचारले जातील. प्रवेशासंबंधी कोणत्याही प्रकारच्या तपशीलवार माहितीसाठी, केवळ अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com