Bombay High Court : अल्पवयीन मुलीला 'आजा आजा' म्हणणे म्हणजे लैंगिक छळ, न्यायालयानं काय म्हटलं?

दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने एका 32 वर्षीय व्यक्तीला बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याच्या (POCSO) तरतुदीनुसार मुलीला वारंवार 'आजा आजा' म्हणल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
Bombay High Court
Bombay High CourtDainik Gomantak

मुलींबाबतीत घडणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना अजूनही थांबायचे नाव घेत नाहीत. याबाबतच आता कोर्टातर्फे एक नवीन माहिती समोर आली आहे. मुलीच्या मागे लागणे आणि तिला वारंवार 'आजा आजा' म्हणणे हा लैंगिक छळ आहे, असे निरीक्षण नोंदवत दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने 32 वर्षीय व्यक्तीला बाल संरक्षण कायद्यान्वये दोषी ठरवले आहे.

ही घटना सप्टेंबर 2015 मध्ये घडली होती. जेव्हा पीडित मुलगी 15 वर्षांची दहावीची विद्यार्थिनी होती. कोर्टासमोर हजर होऊन तिने सांगितले होते की, जेव्हा ती चालत तिच्या फ्रेंच शिकवणीला जात होती, तेव्हा एक 20 वर्षांचा मुलगा सायकलवरून तिच्या मागे-मागे गेला होता आणि वारंवार 'आजा आजा' म्हणत होता.

आणखी काही दिवस त्याने हे चालूच ठेवले. पहिल्या दिवशी तिने रस्त्यावर असणाऱ्या इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता तो सायकलवरून पळून गेला होता. 

तिने तिच्या ट्यूशन शिक्षिका आणि आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. काही वेळातच, तो शेजारच्या इमारतीत नाईट वॉचमन म्हणून काम करत असल्याचे तिला आढळले आणि तिने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर आईने पोलिसात जाऊन त्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली.

Bombay High Court
Uddhav Thackeray: 'देशात बेबंदशाहीची सुरुवात झाली...', निवडणूक आयोगाच्या निकालावर उद्धव ठाकरेंचा घणाघात

त्या व्यक्तीने माफी मागितली आणि न्यायालयाला सांगितले की त्याला पत्नी आणि तीन वर्षांचे मूल असून तो गरीब आहे. त्याला सप्टेंबर 2015 मध्ये त्याला अटक करण्यात आली आणि मार्च, 2016, जेव्हा त्याला जामीन मिळाला तेव्हा या कालावधीत तो आधीच अंडरट्रायल म्हणून गेला होता.

अशा घटनांमुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याचमुळे मुलींना 'आजा आजा' संबोधणे म्हणजेच लैंगिक छळ असेल असे घोषित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com