10 जूनपासून कोकण रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक बदलणार

Konkan Railway
Konkan Railway

Konkan Railway Corporation Limited: कोरोना महामारी लाटेला धैर्याने लढा देत कोकण रेल्वे(konkan) महामंडळाने (KRCL) कोकणवासीयांना रेल्वे(Railway) सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे मार्ग तसेच प्रवासी सुरक्षितता सक्षम केली आहे. पावसाळ्यात या रेल्वे मार्गावरील गस्तीसाठी तसेच देखभालसाठी सुमारे 861 रेल्वे कर्मचाऱ्यांची वर्णी लावली आहे. पावसाळ्यात कोणत्याही दुर्घटनेला सामोरे जाण्यास कोकण रेल्वे महामंडळाची यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या 10 जूनपासून पावसाळ्यातील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलले जाणार असल्याची माहिती महामंडळाचे उपसरव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे यांनी दिली. (The schedule of monsoon Konkan trains will be changed from June 10)

प्रवाशांची सुरक्षा यावर महामंडळाने अधिक भर देत ‘कोरोना’च्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्‍या आहेत. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध लादण्यात आल्याने अनेक कोकणवासीयांना गणेश उत्सवाच्या सणासाठी गावी जाता आले नाही. यंदाही कोरोनाच्या महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या फोफाट्यातून जात असल्याने अजूनही कोकण रेल्वेचा प्रवास करण्यास कोणीही तिकीट आरक्षण करत नाही. एकेकाळी रेल्वे तिकीट आरक्षण मुदतीपूर्वीच ‘कन्फर्म’ तिकीट मिळणे कठीण होत होते. महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रवेशासाठी कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची केल्याने पावसाळ्यात गोव्यात रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांच्या रेल्वेच्या तिकीट आरक्षणाचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनामुळे कोकण रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला तरी सध्या 9 रेल्वे नियमितपणे तर तीन रेल्वे आठवड्यातून एकदा धावत आहेत. यामध्‍ये कोकण कन्या, मांडवी, जनशताब्दी, तेजस, मंगलोर, मत्‍स्‍यगंधा, नेत्रावती, मंगला व गोवा एक्स्प्रेस याचा तर आठवड्यातून एकदा त्रिवेंद्रम राजधानी व पाटणा या एक्स्प्रेसचा समावेश आहे. 

चोवीस तास गस्‍त
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गाच्या असुरक्षित ठिकाणी चोवीस तास गस्त घालण्यात येईल आणि गंभीर ठिकाणी ‘स्टेशनरी वॉचमन’ चोवीस तास तैनात राहतील. असुरक्षित ठिकाणी वेग प्रतिबंधित केले जाईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित हालचाली करण्यासाठी ‘बीआरएन डोंगर उत्खननकर्ता’ खास ठिकाणी तयार ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यात दृश्यमानता मर्यादित असताना अतिवृष्टी झाल्यास लोको पायलटांना ४० कि.मी. प्रतितास वेगाच्या वेगाने गाड्या चालवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन थिएटर’ आणि आपत्कालीन वैद्यकीय सहाय्याची तरतूद असलेले स्वयं-चलित ‘एआरएमव्ही’ (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) रत्नागिरी (महाराष्ट्र) व वेर्णा (गोवा) येथे ठेवण्यात आले आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com