मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी घेतला 
आहे. 

मुंबई :  कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी घेतला 
आहे. 

२३ नोव्हेंबरपासून नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने घ्यावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रायगड आणि पालघर जिल्ह्यात मात्र २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला असून त्या दृष्टीने आरोग्याबाबत योग्य ती खबरदारी प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र देशात विविध राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतही कोरोना रुग्ण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा : 

वाढीव वीज बिलांवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं.. 

संबंधित बातम्या