सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद

सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद
Savdav waterfall of Sindhudurg

सिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच पावसामध्ये प्रवाहित झाला आहे सावडाव धबधबा मागच्या कोरोनाच्या काळापासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र यंदाही पर्यटकांची निराशा होणार हे नक्की. यंदाही वर्ष पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद असणार आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता सिंधुदुर्ग प्रशासनाने सावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे जरी पर्यटकांना प्रत्यक्षात धबधब्याचा आनंद घेता आला नाही तरी आमच्या माध्यमातून या पर्यटनात धबधब्याचा तुम्ही मनमोहक आनंद घेऊ शकता.(See photo video of Savdav waterfall of Sindhudurg)

दरम्यान हवामान खात्याने सिंधुदुर्गाला अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग प्रशासन अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच पुण्यावरून NDRF टीम सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली आहे. एक सावंतवाडीमध्ये तैनात ठेवण्यात आली तर दुसरी मालवणमध्ये तैनात ठेवण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला असून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळतं तर दुसरीकडे वेंगुर्ला तालुक्यातील काही घरातील व्यक्तींना स्थलांतरित चे आदेश देण्यात आलेले आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com