कोरोना संसर्ग टाळा, विजेच्या मीटरचे रिडींग स्वतः च पाठवा: जाणून घ्या

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

महावितरन विभागाने मोबाइल अँप किंवा अधिकृत संकेतस्थळावरून ग्राहकांना स्वतःहून  मीटर रिडींग पाठवण्याची सोय केली आहे. तसेच ग्राहक मॅसेज (sms) च्या माध्यमातून देखील मीटर रिडींग पाठवू शकतात. 

राज्यात कॉरोनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे महावितरण अखत्यारीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन मीटर रिडींग करणे शक्य होत नाही. त्यामुळेच महावितरन विभागाने मोबाइल अँप किंवा अधिकृत संकेतस्थळावरून ग्राहकांना स्वतःहून  मीटर रिडींग पाठवण्याची सोय केली आहे. तसेच ग्राहक मॅसेज (sms) च्या माध्यमातून देखील मीटर रिडींग पाठवू शकतात. (send electricity meter readings manually)

कोरोना महामारीमुळे महावितरणाला मीटर रिडींग घेणे कठीण झाले आहे. त्यामुळलेच महावितरण विभागाने मोबाइलअँप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून मीटर रिडींग करण्याची सोया करून दिली आहे. त्यासोबतच ज्या ग्राहकांकडे (consumer) स्मार्ट मोबाइल  नाहीत, अशा ग्राहकांना मॅसेजद्वारे (sms)  स्वतःहून च मीटर रिडींग पाठवता येणार आहे. 

महाराष्ट्राच्या मदतीसाठी सरसावल्या लता मंगेशकर

 

मीटर रीडिंग पाठवायची प्रक्रिया-

* प्रत्येक महिन्याच्या निश्चत तारखेला वीजमीटर चे रिडींग फोटोद्वारा घेतल्या जाते.  
* ती निश्चत तारीख वीजबिलवर आणि  ग्राहक मीटर क्रमांकसह नमूद  असते. 
* सर्व ग्राहकांना महावितरण विभाग स्वतःहून रिडींग पाठवण्याची मॅसेज (sms) द्वारे प्रत्येक महिन्यात विनंती करेल.  
* त्यांचा मसेज मिळाल्यापासून चार दिवसापर्यंत ग्राहकांनी स्वतःहून मोबाइल अँप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून रिडींग पाठवता येते. 

मॅसेजच्या माध्यमातून मीटर रिडींग -  

 

 

स्वतःहून मीटर रिडींग पाठविल्याने विजेचा  वापर नियंत्रित होणार. ग्राहकांनी (consumer) स्वतःहून रिडींग पाठवल्यामुळे मीटर आणि रिडींगकडे लक्ष राहील. मीटरमध्ये काही बिघाड आल्यास लगेच तक्रार करता येणार. वीजबिल अधिक आल्यास त्या मागचे करणे शोधता येईल. स्वतःहून मीटर रिडींग पाठवण्याचे आवाहन महावितरण विभागाने ग्राहकांना केले आहे.

संबंधित बातम्या