भाजपचा एकनाथ पवारांच्या पक्षात; खडसे यांचा भाजपला 'जय श्रीराम'

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

 विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी आणखी वाढली होती. यानंतर राज्यसभा व विधानपरिषदेबाबतही त्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने यामागे केवळ फडणवीस असल्याची तोफ डागत खडसेंनी राज्यातील भाजप नेतृत्वालाच आव्हान दिले. 

जळगाव- एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरु होती. अखेर भाजपमधील ज्येष्ठ नेते असलेल्या खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश कार्यालयात जावून भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे त्यांनी आपला राजीनामा देण्यात सुपूर्द केला असून आता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसे हे पक्ष नेतृत्वावर नाराज होते.  विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी आणखी वाढली होती. यानंतर राज्यसभा व विधानपरिषदेबाबतही त्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने यामागे केवळ फडणवीस असल्याची तोफ डागत खडसेंनी राज्यातील भाजप नेतृत्वालाच आव्हान दिले. 

गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर नाराज असलेल्या खडसेंनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे संकेत द्यायला सुरूवात केली होती. शरद पवार यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करत चाचपणी केली. त्यानंतर खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला. खडसेंना पक्षात घेतल्यानंतर नेमकी कोणती जबाबदारी देण्यात यावी यावर गेल्या १५ दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. ते सूत्र ठरल्यानंतर अखेर त्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. 

याचदरम्यान खडसेंनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले. मात्र, स्वत: खडसे व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्याचे खंडन केले. अखेरीस आज सकाळी खडसेंनी जयंत पाटील यांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला रिट्वीट केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्का मानला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी रिट्वीट मागे घेतले, पण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे पाठवून दिला. 

संबंधित बातम्या