संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांचे निधन

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले.

नागपूर: विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य (वय ९७) यांचे शनिवारी (ता. १९) दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. उद्या (ता.२०) रोजी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले मा. गो. वैद्य यांनी मॅट्रिकपासून इंटर आर्टसपर्यंत प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केल्या. बीएची परीक्षाही ते संस्कृत विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सरस्वतीबाई कोलते सुवर्णपदक तसेच एमए परीक्षेत त्यांना दाजी हरी वाडेगावकर सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. १९४६ ते १९६४ या काळात त्यांनी न्यू ईरा हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, कुर्वेज न्यू मॉडेल या संस्थांमध्ये शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर हिस्लॉप कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली.

आणखी वाचा:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता जनतेशी संवाद साधणार -

वैद्य यांनी मागील अनेक दशकांपासून स्वतःला रा.स्व. संघाच्या कार्यासाठी झोकून दिले होते. भाजपला बळकट करण्यामध्येही त्यांचे मोठे योगदान आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संबंधित बातम्या