सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया चे सीईओ अदर पुनावाला लसीकरण मोहिमेत सहभागी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

कोविशील्ड या लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आज लस टोचून घेतली .

पुणे : समस्त देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास आजपासून सुरूवात झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी या लसीकरनाची सुरवात झाली आहे. नागरीकांनी या मोहीमेला सहकार्य करावे असे आवाहन पंरप्रधानांनी केले.

सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात असतांनाच त्यांना लसीबद्दल माहीती सुध्दा देण्यात येत आहे.

कोविशील्ड या लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आज लस टोचून घेतली . जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. अस अदर पूनावाला यांनी ट्विट करून म्हटलं आहे. सोबतच कोरोना लस स्वतः घेत असतांनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम दिसत नाही किंवा जाणवत नाही हे जाणून घेण्यासाठी अदर पुनावाला यांनी कोरोना लस टोचून घेतली आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

"या लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी मी स्वत: ही लस घेतली आहे. त्याचबरोबर ही लस घेवून मी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झालो. कोविशील्ड या ऐतिहासिक प्रयत्नांचा मी एक भाग होवू शकलो याचा मला अभिमान आहे."

संबंधित बातम्या