महाराष्ट्राला सिरम इन्स्टिटयूट करणार मोठी मदत

दैनिक गोमंतक
रविवार, 25 एप्रिल 2021

लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून देशभर सुरू होत आहे, यामुळे कोरोना विषाणूविरूद्ध लढाई अधिक तीव्र झाली आहे.

लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून देशभर सुरू होत आहे, यामुळे कोरोना विषाणूविरूद्ध (Corona Virus) लढाई अधिक तीव्र झाली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक विध्वंस झालेल्या महाराष्ट्राला लसीकरणात सीरम संस्थेचे संपूर्ण सहकार्य मिळेल असे महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO Maharashtra)  ट्विट करत सांगितले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने शनिवारी ट्विट केले, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute) शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील लोकांना लसीकरणात जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचे 6,94,480 सक्रिय रुग्ण आहेत देशात सर्वात जास्त बाधित रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आमच्या राज्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सारखी जागतिक स्तरीय संस्था असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही आमच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी रणनीतीपुर्वक भागीदारीची अपेक्षा करतो असे एका दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Serum Institute will be a big help to Maharashtra)

महाराष्ट्र हादरला! पाच जणांचा सॅनिटाइझर प्यायल्याने मृत्यू

वास्तविक, सीरम संस्थेची लस कोविशील्ड आहे, जी भारताच्या लसीकरण मोहिमेतील सर्वात मोठे शस्त्र आहे. भारत सरकारने कोविशील्डसह (Covishild) भारत बायोटेकच्या कोवाक्सिनच्या (Covaxine) आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. आतापर्यंत, कोविशील्ड आणि कोवाक्सिन यांच्यासह भारतात लसीकरण मोहीम सुरू आहे, परंतु पुढील एक महिन्यात, स्पुतनिक-व्ही ही रशियन लस या मोहिमेमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे 67 हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत आणि  सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर मुंबईत गेल्या 24 तासांत 5 हजार 888 नवीन रुग्ण आढळले आहेत. 

गेल्या तीन आठवड्यांपासून मुंबईत पहिल्यांदाच एवढे कमी रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात शनिवारी 63 हजार 818 कोरोनाचे रुग्णही बरे झाले आहेत. राज्यात आता कोरोनाचे 6 लाख 94 हजार 480 सक्रिय रुग्ण आहेत. त्याचबरोबर ताज्या आकडेवारीनुसार राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.51 टक्के आहे. त्याचवेळी, 31 मार्च रोजी मुंबईत 5,394 नवीन रुग्ण नोंदले गेले होते, तर 12 एप्रिलपासून दररोज 7000 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. तथापि, कोरोनामुळे गेल्या 24 तासांत मुंबईत 71 लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, 1 मेपासून सीरम आपली लस राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांनाही विकू शकणार आहे.

 

संबंधित बातम्या