सीरम इन्स्टिटय़ूटच्या 'कोवीशिल्ड' लसीचे देशभरात वितरण सुरु 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

सीरम इन्स्टिटय़ूटच्या 'कोवीशिल्ड' लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर सीरम इन्स्टिटय़ूट पुणे या ठिकाणाहून अखेर वितरण करण्यास सुरुवात झाली.

पुणे:सीरम इन्स्टिटय़ूटच्या 'कोवीशिल्ड' लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर सीरम इन्स्टिटय़ूट पुणे या ठिकाणाहून अखेर वितरण करण्यास सुरुवात झाली.16 जानेवारीपासून देशभरात कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम सुरु होणार आहे.सीरम इन्स्टिटय़ूटमधून 'कोवीशिल्ड' लसीचे सहा कोल्ड स्टोरेज कंटनेर रवाना करण्यात आले.त्यापैकी तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना करण्यात आले. तत्पूर्वी इन्स्टिटय़ूटच्या परिसरात कंटनेरची पूजा करण्यात आली.

परिमंडळ पाचच्या पोलीस  उपाआयुक्त नम्रता पाटील यांनी हार घालून नारळ वाढवून कंटनेरला मार्गस्थ केले.पुण्यातून 'कोवीशिल्ड' लस देशभरातील 13 मुख्य शहरांमध्ये पाठवण्यात येणार आह. त्यात मुख्यत: औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई,गुवाहाटी, बंगळूर,कर्नाल,विजयवाडा,कोलकाता,लखनऊ,चंदिगढ,भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.पुणे विमानतळावरुन आज सकाळी 8 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.एकूण 8 प्लाइटपैकी 2 प्लाइट्स कारगो प्लाइट असणार आहेत.केंद्रसरकार सीरम इन्स्टिटय़ूटकडून 'कोवीशिल्ड' लसीचे 1कोटी 10 लाख डोस खरेदी करणार आहे.अॉक्सफर्ड आणि अस्त्राझेनेका यांनी मिळून विकसीत केलेल्या लसीची निर्मिती पुणेस्थित सीरम इन्स्टिटय़ूटकडून करण्यात आली आहे.जीएसटीसह 'कोवीशिल्ड'लसीच्या प्रत्येक डोसची किंमत210 रुपये असणार आहे.असं सीरम इन्स्टिटय़ूटच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.

संबंधित बातम्या