मालेगावात सात संशयीतांचा मृत्यू 

Dainik Gomantak
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 675 झाली आहे. बुधवारी नव्याने विविध रूग्णालयात 43 जण दाखल झाले. 140 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

मालेगाव

शहरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी (ता.20) दोन टप्प्यात आलेल्या अहवालात 16 कोरोना पॉंझिटिव्ह मिळून आले. यात शहराजवळील द्याने येथील एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात फरान मध्ये चार व सहारा हॉस्पीटलला तीन अश्‍या सात संशयीतांचा मृत्यु झाला असून संशयीत मृतांची संख्या 74 झाली आहे. 
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 675 झाली आहे. बुधवारी नव्याने विविध रूग्णालयात 43 जण दाखल झाले. 140 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. आज सहारा हॉस्पीटल मधील रूग्णांकडे होणारे दुर्लक्ष व स्वच्छेचा अभाव याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला अन्‌ पुन्हा गोंधळ उडाला. येथे उपचार घेत असलेल्या महिला रूग्णांनी आमच्याकडे कोणी लक्ष देत नसल्याची तक्रार केली. 
आज नव्याने पॉंझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये नऊ पुरूष व चार महिला तर दहा वर्षाखालील दोन मुले व एका मुलीचा समावेश आहे. गेली चार दिवस रूग्णसंख्या घटली होती. दोन दिवसात नव्याने 47 रूग्ण मिळून आले. मंगळवार (ता.19)पर्यंत 415 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. कोरोनाबाधित मृतांची संख्या 42 झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 855 रूग्ण बाधित होते. त्यापैकी 601 बरे झाले असून 212 जणांवर उपचार सुरू आहे. 224 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. 

हज हाऊस मध्ये डीजिटल एक्‍स- रे
मालेगावातील हज हाऊस रूग्ण तपासणीसाठी डीजिटल एक्‍स- रेची सुविधा बुधवारी उपलब्ध करून देण्यात आली. उद्या केबीएच महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेमुळे संशयित रूग्णांचा एक्‍स- रे काढून पुढील उपचार करणे सोयीचे होणार आहे.

संबंधित बातम्या