मोदी सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर: शरद पवार

त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर(Modi government) हल्लाबोल केला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak

देशामध्ये मागील काही दिवसांपासून लखीमपूर खेरी प्रकरणावरुन मोदी आणि योगी सरकारवर विरोधक निशाणा साधत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे मात्र भारत चीन यांच्यातील सीमाविवाद अधिकच चिघळत चालला आहे. सीमावादासंबंधी अनेक वेळा भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या मात्र त्या चर्चेच्या फेऱ्या विफल ठरल्या असल्याची त्यांनी यावेळी नमूद केले.

पवार म्हणाले, सीमाप्रश्नावरुन देशात कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत याचा सामना केला पाहिजे. त्यामुळे यासंबंधी तात्काळ योग्य भूमिका घेण्याची गरज आहे. तसेच देशातील उच्च संस्थांचा मोदी सरकार गैरवापर करत आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून काही प्रतिष्ठित लोकांना टार्गेट केले जात आहे. त्याचबरोबर राजकिय स्वार्थासाठी या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा उल्लेख केला आहे.

Sharad Pawar
लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध करत अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा

तसेच, ते पुढे म्हणाले, ''राज्याच्या माजी गृहमंत्र्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे गायब झाले आहेत याचा आम्ही शोध घेत आहोत म्हणत, मोदी सरकारवर पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमधील शेतकऱ्यांच्या शांततामय मोर्चावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर या शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप असताना त्यांचा भाजपचे मंत्री, योगी सरकार बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच लखीमपूर खेरीमध्ये जे घडलं ते आत्तापर्यंत कधीच घडलं नाही. लखीपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराची जबाबदारी योगी सरकारला टाळता येणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षांनी त्यासंबंधी योग्य भूमिका घेणे गरजेचे होते. शिवाय, मावळ घटनेवरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com