शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली; उपचारांसाठी ब्रिचकँडी रुग्णालयात दाखल

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

शरद पवार यांना काही दिवसांपूर्वीच प्रकृती खालावल्याच्या कारणावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती पुन्हा ढासळली आहे. पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शरद पवारांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती  दिली आहे.  

सोमवारी शरद पवार यांच चेकअप केल्यानंतर असे आढळले की त्यांच्या गोल्ब्लेडरमध्ये समस्या आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर 31 मार्च 2021 रोजी एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार होती असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक सांगितले आहे. शरद पवार यांना उद्या  एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते, मात्र पोटात अत्यंत वेदना होत असल्याने त्यांना आजच  मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शरद पवारांच्या प्रकृतिची फोन वरून चौकशी केली होती. 

शरद पवार यांना काही दिवसांपूर्वीच प्रकृती खालावल्याच्या कारणावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच आता पुन्हा ही बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील शरद पवार हे आमच्यापेक्षा तरुण नेते असून ते बरे होऊन बाहेर येतील आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करू असा विश्वास व्यक्त केला होता.  

महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय? पंतप्रधान मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीची...

संबंधित बातम्या