कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा देऊळ बंद; प्रशासन अलर्ट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.  त्यामुळे भक्तांना आता इथून पुढचे काही दिवस श्रींचे दर्शन घेता येणार नाही.

बुलडाणा : मागिल काही महिन्यांपासून राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या अधिकाधिक वाढू लागलेली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.  त्यामुळे भक्तांना आता इथून पुढचे काही दिवस श्रींचे दर्शन घेता येणार नाही.

कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यांतल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये बघायला मिळतो आहेय. त्याचबरोबर आता ग्रामीण भागांत देखील कोरोनाने डोके वर काढले आहे. विदर्भात गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाने कहरच केला आहे. यवतमाळ, अकोला, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भ प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. गर्दीच्या ठिकाणांवर विदर्भ प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे इथून पुढचे काही दिवस शेगाव येथिल गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शेगाव संस्थान पुढील आदेशांपर्यंत बंद

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विभागीय आयुक्त अमरावती तसेच बुलडाणा  जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे शक्य नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशा येईपर्यंत बंद ठेवण्यात येईल. पुढील आदेशा येईपर्यंत श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत शेगाव संस्थानने हा निर्णय घेतला आहे. असे संस्थान प्रशासनाने सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन शेगाव संस्थान करत असल्याचेही संस्थान प्रशासनाने सांगितले आहे.

पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर दोन दिवस बंद

त्याचबरोबर पंढरपूर येथिल विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आज आणि उध्या बंद राहणार आहे. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर यंदाची माघी यात्रा रदद् केली गेली आहे. माघी एकादशी असल्याने मंदिर आज आणि उद्या बंद राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढची परिस्थिती पाहून पूढील आठ दिवसांचा अल्टिमेटम जनतेला दिला आहे. तसेच पुन्हा लॉकडाऊन करायचं का? असा प्रश्नही जनतेला केला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील देवस्थाने आणि मंदिरे पुन्हा एकदा बंद होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. यासंबंधी निर्णय शासन येत्या काही दिवसांत घेऊ शकते.

विदर्भात पुन्हा कोरोना कहर

मागील काही दिवसांपासून विदर्भात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला, अशी चर्चा असतानाच आता कोरोना पुन्हा आला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.  गेल्या 15 दिवसांपासून  विदर्भात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. असे असले तरी मृत्यूदरात मात्र घट पाहायला मिळत आहे.

गेल्या 20 दिवसांमध्ये विदर्भात मृत्यूदरात घट नोंदविण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2021ला 2.54 टक्के असलेला मृत्यूदर आता 2.43 टक्क्यांवर आला आहे. काल20 फेब्रुवारीपर्यंत विदर्भात 235 कोरोना मृत्यूची नोंद झालेली आहे.

 

संबंधित बातम्या