शिंदे सरकार सहा महिन्यांत पडू शकते, मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा :शरद पवार

राष्ट्रवादीचे आमदार आणि पक्षाच्या अन्य नेत्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी सरकारबाबत सांगितले.
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार (State Government) येत्या सहा महिन्यांत पडण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी सांगितले आहे. पवार यांनी रविवारी सायंकाळी येथे राष्ट्रवादीचे आमदार आणि पक्षाच्या अन्य नेत्यांना संबोधित करताना सरकारबाबत सांगितले. (Shinde government may fall in six months, be ready for mid term elections Sharad Pawar)

Sharad Pawar
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत गोमंतकीय सुपूत्राचा सन्मान

या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या एका नेता बोलला की, "महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले सरकार येत्या सहा महिन्यांत पडू शकते, त्यामुळे सर्वांनी मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहायला हवे." शिंदे यांना पाठिंबा देणारे अनेक बंडखोर आमदार खूश नाहीत. मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर त्यांचा असंतोष चव्हाट्यावर येईल, शेवटी सरकार पडेल.

हा प्रयोग अयशस्वी झाल्याने अनेक बंडखोर आमदार त्यांच्या मूळ पक्षात परतणार असल्याचेही पवार यांनी अधोरेखित केले. या बैठकीला उपस्थित असलेल्या या नेत्याने असेही सांगितले की, पक्षाध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात अधिक वेळ घालवावा.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra New CM Eknatah Shinde) सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत आपली ताकद सिद्ध करतील. राज्यपालांच्या आदेशानुसार विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी फ्लोअर टेस्ट होणार असून, त्यात एकनाथ शिंदे यांना बहुमताने सरकारमध्ये असल्याचे सिद्ध करावे लागेल.

Sharad Pawar
बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटात खलबतांना वेग

मात्र, काल झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्याच गटाचे उमेदवार आणि भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांचा विजय झाल्याने शिंदे यांच्यासाठी फ्लोर टेस्टचा मार्ग सुकर झाला. कारण किती आमदार नव्या सरकारच्या बाजूने आहेत हे कालच स्पष्ट झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com